TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

गणेशोत्सवातील गर्दीत मोबाईल चोरी , चोरट्याला पकडले; दोन मोबाईल संच जप्त

पुणे : गणेशोत्सवात गर्दीत भाविकांकडील मोबाईल संच लांबविणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. त्याच्याकडून दोन महागडे मोबाईल संच जप्त करण्यात आले.प्रेमकुमार ब्रम्हय्या पी (वय २४, रा. रंगारेड्डी, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. गणेशोत्सवात मोठ्या संख्येने भाविक परगावाहून येतात. गर्दीत प्रेमकुमारने नागरिकांकडील मोबाईल संच लांबविले होते. तो पुणे स्टेशन परिसरात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी मोहसीन शेख आणि प्रमोद कोकणे यांना मिळाली.

पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे दोन महागडे मोबाईल संच आढळून आले. त्याने पुणे महापालिका परिसरातून मोबाईल संच लांबविल्याची कबुली दिली. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन कांबळे, शंकर नेवसे, प्रमोद कोकणे, संजय जाधव, मोहसीन शेख, रेश्मा उकरंडे आदींनी ही कारवाई केली.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button