Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोथरूडमधील रस्ते आणि पाणीप्रश्नासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक, वस्तुनिष्ठ अहवाल साधर करण्याचे महापालिकेला आदेश

पुणे : कोथरूड मधील रस्ते आणि पाणी प्रश्नासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि पथ विभागाने तातडीने वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली असून अहवालाच्या आधारे पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे. कोथरूड मतदारसंघातील पाणी आणि रस्त्यांच्या समस्येसंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या निवास्सथानी बैठक झाली.

मालमत्ता विभागाचे अतिरिक्त आयुक्त महेश पाटील, पाणीपुरवठा विभागाचे नंदकुमार जगताप, भवन विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, महसूल विभागाचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे, विलास भालेराव यांच्यासह दक्षिण कोथरूडचे मंडल अध्यक्ष डाॅ. संदीप बुटाला, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, माजी नगरसेवक दीपक पोटे उपस्थित होते.

कोथरुडमधील पाणीपुरवठ्यातील अडचणींची माहिती पाटील यांनी घेतली. यात प्रामुख्याने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वस्ती आणि सोसायटी भागात समान पाणीपुरवठा व्हावा; यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. कोथरुड मधील वस्ती भाग हा अनेक ठिकाणी चढावर वसलेला असल्याने उन्हाळ्यात पाणीपुरवठा करताना मर्यादा येत असल्याची बाब अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. यामध्ये प्रामुख्याने सुतारदरा, किष्किंधा नगर, केळेवाडी भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. त्यावर उपाय म्हणून लोकसहभागातून वस्ती भागाच्या सुरुवातीला पाण्याच्या टाक्या उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच या टाक्यांमध्ये महापालिकेने पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचना पाटील यांनी केली.

हेही वाचा –  पुढील 3 महिने सूर्य ओकणार आग, ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा

विकास आराखड्यातील रस्त्यांबाबतही बैठकीत चर्चा झाली. परांजपे शाळेसमोरील डीपी रस्त्यामधील एक रहिवासी न्यायालयात गेल्याने रस्त्याची कामे रखडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचा दावा पथ विभागाकडून करण्या आला. हा रस्ता नागरिकांच्या सुविधेसाठी आवश्यक असल्याने महापालिकेने न्यायालयात प्रभावी बाजू मांडावी, अशी सूचना पाटील यांनी केली. चांदणी चौकातील मुख्य महामार्गालगत एकलव्य महाविद्यालय येथून जाणाऱ्या १५ मीटरच्या रस्त्याचा प्रश्न अद्याप का प्रलंबित आहे, अशी विचारणा पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे केली.

बाणेर बालेवाडी भागातील नागरिकांकडून नाट्यगृह उभारण्याची मागमी सातत्याने होत आहे. तसेच कोथरुड मध्येही शास्त्रीय नृत्यासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी संकुल उभारण्याची मागणी स्थानिक नागरीक तथा कलाप्रेमींकडून होत आहे. दोन्ही मागण्यांच्या अनुषंगाने जागा आणि नाट्यगृह किंवा संकुल उभारण्यासाठी अपेक्षित खर्च आदींवर अभ्यास करून अहवाल करण्याची सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button