ताज्या घडामोडीपुणे

मण्यार हा भारतात आढळणाऱ्या सापांच्या प्रजातीमध्ये सर्वात विषारी साप

भारतामध्ये विषारी प्रजाती आढळून येतात त्यामध्ये फुरसे, मण्यार, नाग आणि घोणस या सापांच्या प्रजातींना बीग फोर असं देखील म्हणतात.

पुणे : सामान्यपणे किंग कोबरा हा भारतातील सर्वात विषारी साप आहे असं मानलं जातं. मात्र भारतामध्ये अशा देखील काही सापांच्या जाती आहेत ज्या नागापेक्षाही जास्त विषारी असतात. त्यांच्या दंशामुळे होणारा मृत्यू रेट देखील नागाच्या दंशापेक्षा अधिक आहे. भारतामध्ये ज्या सापांच्या विषारी जाती आहेत, त्यामधीलच एक जात म्हणजे मण्यार. मण्यार जातीचा साप हा अत्यंत विषारी असतो. हा साप चावल्यानंतर झालेल्या मृत्यूचं प्रमाण देखील अधिक आहे. हा साप सात फुटांपर्यंत वाढू शकतो.

भारतामध्ये सापाच्या जवळपास 350 प्रजाती आहेत.मात्र त्यातील केवळ वीस टक्के सापच विषारी आहेत. भारतामध्ये ज्या सापाच्या विषारी प्रजाती आढळून येतात त्यामध्ये फुरसे, मण्यार, नाग आणि घोणस या चार प्रमुख प्रजातींचा समावेश होतो. या सापांच्या प्रजातींना बीग फोर असं देखील म्हणतात. सापाच्या या विषारी प्रजातील भारतामधील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आढळून येतात. आज आपण यातीलच एक प्रजात असलेल्या मण्यार सापाबाबत माहिती घेणार आहोत.

हेही वाचा –  ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डचे मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मण्यार हा भारतात आढळणाऱ्या सापांच्या प्रजातीमध्ये सर्वात विषारी साप आहे. या सापाची प्रमुख ओळख म्हणजे याच्या अंगावर विशिष्ट प्रकारचे पट्टे असतात. तसेच त्याची त्वचा चमकदार असते. तुम्ही दूरून देखील या सापाला पाहिलं तर सहज ओळखू शकता. या सापाच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. या सापाचा समावेश हा जगातील सर्वात विषारी सापाच्या दहा प्रजातींमध्ये होतो.मात्र हा साप स्वत:हून कधीच हल्ला करत नाही, त्याला धोका जानवला तरच तो दंश करतो. साप हेच या मण्यारचं मुख्य अन्न आहे, तो दुसऱ्या सापांना खाऊन आपलं पोट भरतो. सापांसोबतच तो उंदीर आणि बेडूक देखील खातो.

सर्वतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या सापाचं विष न्यूरोटॉक्सिन प्रकारचं आहे. या सापाने चावा घेतल्यास तुमच्या शरीरामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रक्त प्रवाहित होत नाही, त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. मात्र योग्यवेळेत जर उपचार मिळाले तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. मात्र असा साप तुम्हाला दिसल्यास चुकूनही त्याच्या जवळ जाण्याची चूक करू नका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button