Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कात्रज-कोंढवा रस्ता आता ८४ मीटर होणार

पुणे :  महापालिकेकडून कात्रज-कोंढवा ( खडीमशिन चौक) पर्यंत रस्ता रूंदीकरण करत हा रस्ता ८४ मीटर करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, रस्ता ८४ मीटर रूंद करण्यासाठी भूसंपादनास मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने महापालिकेने हा रस्ता ५० मीटर करण्याचा निर्णय घेत शासनाकडे या रस्त्यासाठी २०० कोटींची मागणी केली होती. मात्र, शासनाने केवळ १४० कोटींचा निधी पालिकेस दिला.

मात्र, आता अवघ्या दोन वर्षांतच महापालिकेने पुन्हा एकदा आपला निर्णय बदलला असून आता हा रस्ता पुन्हा ८४ मीटर केला जाणार आहे. यासाठी सुमारे तब्बल ९० हजार चौरस मिटर जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे. त्याच्या भूसंपादनासाठी महापालिकेने आणखी २३१ कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केल्याची माहिती महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

हेही वाचा     –      ‘पंकजा मुंडेंनी भाजपचे काम केले नाही’; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप

महापालिकेकडून या रस्त्याचे काम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. हा चार किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी पालिकेस भूसंपदानासाठी ७१० कोटींची गरज होती. मात्र, निधी अभावी पालिकेने अडीचशें कोटींच्या कामाची निविदा काढली. त्यानंतर कामासाठी जागाच नसल्याने हे काम रखडले. या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ अधिक असल्याने अनेक अपघात घडले आहेत त्यात काहींचे प्राण गेले असून अनेक जण जायबंदी झाले आहेत.

त्यामुळे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी हा रस्ता ५० मीटरच रूंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे भूसंपदानाचा खर्च कमी होऊन तो २८० कोटी झाला. यामध्ये महापालिकेने ८० कोटींचा खर्च करण्याची तयारी दाखवित शासनाकडे २०० कोटींच्या निधीची मागणी केली. मात्र, शासनाने केवळ १४० कोटीच निधी दिला. त्यातून ५०० मीटर रस्त्यासाठी भूसंपादन सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कात्रज-कोंढवा रस्त्यासंदर्भात बैठक घेतली. त्यामध्ये महापालिकेने भूसंपादन करून द्यावे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे रस्त्याचे काम केले जाईल, अशी सूचना केली आहे. त्यामुळे महापालिकेने आता संपूर्ण रस्ता ८४ मिटर रुंदीचा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ८४ मिटर रुंदीचा रस्ता करण्यासाठी महापालिकेला ९० हजार चौरस मिटर जागेची आवश्‍यकता आहे, त्यासाठी २३१ कोटी रुपये खर्च येणार आहे. ही रक्कम उपलब्ध व्हावी यासाठी प्रस्ताव पाठवला असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button