पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत २१ वी पशुगणना चालू

पिंपरी : महाराष्ट्र शासनाकडील पशू संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागामार्फत २५ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत २१ वी पशू गणना करण्यात येत आहे.
शासनाच्या विविध विकासाचे नियोजन, धोरणात्मक निर्णय घेणेकामी तसेच दुध, अंडी व मांस या प्रमुख पशुजन्य पदार्थाच्या उत्पादनाची आकडेवारी तयार करणेसाठी पशू गणना महत्वाची आहे.
हेही वाचा – ‘राहुल गांधींमुळे मला दुखापत’, भाजपा खासदाराचा आरोप; राहुल गांधी म्हणाले..
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील घरगुती, संस्था व गोशाळा पशू मालकांकडे असलेल्या १६ प्रजातीपैकी (गाय वर्गीय, म्हैस वर्गीय सह पशूंसह, मिथून, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, शिंगरु, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती) व कुक्कट पशी (कोंबडे-कोंबड्या, बदक, टर्की आणि इमू, क्वेल, गिनी, शहामृग) यांची जाती निहाय, वयोगट.
तसेच लिंगनिहाय व उपयोगानुसार ५० प्रगणकाकडे माहिती देऊन सहकार्य करणेबाबत महापालिके मार्फत पशू पालकास आवाहन करण्यात येत आहे. पशू गणनेचे कामकाज मे. अॅनिमल हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेमार्फत सुरु आहे.





