कीटकजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/mahaenews-18-3-780x470.jpg)
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांमध्ये चिकुनगुनिया, डेंग्यूसारख्या कीटकजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. विषाणूच्या ट्रेंडमधील बदल आणि डासांच्या प्रजननासाठी अनुकूल वातावरण यामुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
यंदा शहरात. झिका विषाणूचे १००, डेंग्यूचे २५१ आणि चिकुनगुनियाचे २२५ रुग्ण आढळले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, नॅशनल सेंटर फॉर व्हेक्टर बोर्न डिसीजेस कंट्रोल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर यंदा महापालिकेच्या आरोग्य विभागाने संशयित रुग्णांची तपासणी आणि आजारांच्या प्रादुर्भावावरनियंत्रण याकडे बारकाईने लक्ष दिले आहे.
हेही वाचा – १५ दिवसांत आचारसंहिता लागेल; अजित पवारांचं विधानसभा निवडणुकांबाबत मोठं विधान
तरीही, वातावरणातील अनपेक्षित बदलांमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ होताना दिसत आहे. महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे म्हणाले, चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये विषाणूचा ट्रेंडमधील बदलांमुळे वाढ होताना दिसत आहे.
विषाणू साधारणपणे दहा वर्षांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणतो. त्यामुळे ठरावीक काळाने कीटकजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. एकदा संसर्गाविरुद्ध सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित झाली की हळूहळू रुग्णसंख्या कमी