शिवस्मारकासह विविध मागण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालाची भेट
अरबी समुद्रात होणारे स्मारक राजभवनाच्या जागेत करण्याची मागणी

मुंबई : शिवस्मारकासह विविध मागण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार आणि प्रवक्ते शिवानंद भानुसे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात करण्याऐवजी राजभवनाच्या जागेत उभे करावे. ही संभाजी ब्रिगेडची अनेक दिवसापासून मागणी असुन त्यासाठी राज्यसरकार कसलीही हालचाल करत नाही.
हेही वाचा – ‘सरकार कुणाचंही असो आठवलेंच मंत्रिपद पक्क’; नितीन गडकरींची मिश्किल प्रतिक्रिया
मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन होऊन अनेक वर्षे होऊन गेलेली असताना कुठलेही काम न करता कोट्यावधी रुपयाचा खर्च झाल्याची आम्हाला माहिती मिळाली असुन ही सरकारने केलेली जनतेची फसवूनक आहे. सरकारला खरंच स्मारक करायचे असेल तर त्यांनी अरबी समुद्रात होणारे स्मारक राजभवनाच्या जागेत करावे. जेणेकरून शिवस्मारक सामान्य जनतेला पाहण्यासाठी सहज उपलब्ध होईल. अरबी समुद्रातील स्मारक कुठल्याही दृष्टीने जनतेला परवडनारे नसुन सरकारलाही त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रचंड खर्च येईल. त्यामुळे आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी झाली.
तसेच राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मंजुर झालेले २५%अग्रीम अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे.आणि राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला असुन त्यांच्या सुरक्षेसाठी कडक उपाय योजना करण्यात याव्यात.चर्चे दरम्यान अभिमन्यु पवार यांनी राज्य सरकार निष्क्रिय झालेले असुन राज्यपालांनी वरील विषयात जातीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.