TOP Newsताज्या घडामोडीपुणे
मांजरी, चतु:शृंगी भागात सदनिकांची कुलुपे तोडून चोरीच्या घटना
![Incidents of thefts by breaking the locks of flats in Cat, Chatu:Shringe area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/theft-780x470.jpg)
शहराच्या वेगवेगळ्या भागात सदनिकांची कुलुपे तोडून चोरट्यांनी साडेसोळा लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचा घटना उघडकीस आल्या. मांजरी आणि चतु:शृंगी भागात या घटना घडल्या.
याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मांजरी ग्रीन सोसायटीत राहायला आहे. महिला आणि कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील रोकड, सोन्याचे दागिने असा १३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करत आहेत.
चतु:शृंगी भागातील राजंश साेसायटीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख ६० हजारांचा ऐवज चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक तपास करत आहेत.