Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुणे मेट्रोचं उद्घाटन, भविष्याचा वेध अन् विरोधकांवर निशाणा; नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो या मार्गिकेचं ऑनलाईन उदघाटन झालं आहे. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी प्रत्यक्षात उपस्थित राहणार होते. 26 सप्टेंबरला या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन होणार होतं. पण मुसळधार पावसामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला. आता आज या मेट्रो मार्गिकेचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केलं गेलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांना संबोधित केलं. तेव्हा त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पुण्याच्या आधुनिक गती पाहता आधीच काम सुरू करायला हवं होतं. पुण्यात मेट्रो आधीच यायाला हवी होती. पण गेल्या दशकात आपल्या देशात शहरी भागात प्लानिंग आणि व्हिजन याचा अभाव होती. एखादी योजना आखली जायची पण त्याची फायल पुढे जायची नाही, असं म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधरांवर हल्लाबोल केलाय.

महाराष्ट्राला नव्या संकल्पाने पुढे जायचं आहे. पुणे ज्या पद्धतीने पुढे जात आहे, या ठिकाणी लोकसंख्याही वाढत आहे. पुण्यातील वाढती लोकसंख्या शहराच्या गतीला कमी करू नये. उलट त्याचं सामर्थ्य वाढवलं पाहिजे, त्यासाठी आतापासूनच पावलं उचलली पाहिजे. जेव्हा पुण्यातील वाहतूक व्यवस्था आधुनिक होईल तेव्हा हे होईल, शहराचा विस्तार तर व्हावा पण एका भागााची दुसऱ्याशी चांगली कनेक्टिव्हीटी चांगली राहिली पाहिजे. आज महायुतीचं सरकार याच विचाराने काम करत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

पुण्यात मेट्रो बनवण्याची चर्चा २००८ मध्ये झाली. पण २०१६मध्ये आमच्या सरकारने ही सुरुवात केली. आमच्या सरकारने वेगाने निर्णय घ्यायला सुरुवात केली. आता पाहा पुणे मेट्रोचा विस्तार होत आहे. आजही आम्ही जुन्या कामाचं लोकार्पण केलं आहे. त्याचबरोबर कात्रज रोड ते स्वारगेटच्या एका रुटचं शिलान्यास केला आहे. जुने विचार आणि कार्यपद्धती असती तर ही कामे झालीच नसती. मागच्या सरकारला आठ वर्षात मेट्रोचा एक पिलरही उभा करता आला नाही. पण आमच्या सरकारने पुण्यात मेट्रोचं आधुनिक नेटवर्क तयार केलं आहे. राज्याच्या प्रगतीसाठी विकासाला प्राधान्य देताना त्यात निरंतरता ठेवली पाहिजे, असं म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

हेही वाचा – दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद टळला? शिंदेंचा मेळावा ‘या’ मैदानावर होण्याची शक्यता

जेव्हा त्यात अडथळे येतात तेव्हा महाराष्ट्राला नुकसान होतं. मेट्रो असेल, सिंचनाचे प्रकल्प, बुलेट ट्रेन असो आम्ही यावर निर्णय घेतले. पण आधीच्या सरकारने हे प्रकल्प लटकवले होते. बिडकीन औद्योगिक विभाग हे एक उदाहरण आहे. आमचं सरकार असताना फडणवीस यांनी ऑरेंज सिटीची संकल्पना ठेवली. त्यांनी सिंद्रा औद्योगीकची पायाभरणी ठेवली होती. नॅशनल कोरिडोरकडून हे काम होणार होतं. पण नंतर हे काम थांबलं. आता शिंदे यांच्या नेतृत्वात हे काम सुरू होत आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मागच्या सरकारने महिलांची एन्ट्री बंद केली होती. मुलींना शाळेचे दरवाजे बंद होते. मुली मोठ्या झाल्यावर त्यांना शाळा सोडावी लागायची. सैनिक शाळेत महिलांना प्रवेश नव्हता. प्रेगन्सीमध्ये महिलांना नोकरी सोडावी लागायची. आम्ही जुन्या सरकारच्या जुन्या मानसिकतेला बदललं. जुनी व्यवस्था बदलली. आम्ही स्वच्छ भारत योजना आणली. महिलांना त्याचा फायदा झाला. शाळेत शौचालये आणली गेली. त्यामुळे मुलींची शाळा सोडण्याचं प्रमाण कमी झालं. आम्ही आर्मी स्कूलच नव्हे तर सैन्यात अनेक पदावर महिलांना घेतलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button