लग्नाचे अमिश दाखवून गुंगीचे औषध पाजून केला बलात्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/rape_clipart.jpg)
पिंपरी | लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने महिलेला लग्नाचे अमिश दाखवून बेंगलोर, पुणे येथे वेगवेगळ्या ठिकाणी नेले. तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार 24 जानेवारी 2020 ते 1 जानेवारी 2021 या कालावधीत घडला आहे.सचिन बलदेव शर्मा (रा. विकास कॉलनी, पटियाला, पंजाब) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने 24 नोव्हेंबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपीची ‘शादी डॉट कॉम’ या वेबसाईटवरून ओळख झाली होती. सचिन याने महिलेला लग्नाचे अमिश दाखवले. महिलेला पुणे आणि बेंगलोर येथे विविध ठिकाणी नेले. महिलेला गुंगी येणारे औषध कोल्ड्रिंक्स मध्ये मिसळून दिले. महिला बेशुद्धावस्थेत असताना सचिन याने महिलेवर बलात्कार केला. सचिन याने बलात्कार आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.