Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

राज्यात गोरगरीबांना 14 जूनपर्यंत मोफत मिळणार शिवभोजन

मुंबई |महाईन्यूज|

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ (break the chain) अंतर्गत १५ एप्रिलपासुन विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात काेणतीही व्यक्ती उपाशी राहू नये. यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकराने शिवभोजन थाळी (shivbhojan thali) मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामुळे गरजूंना एक वेळचे माेफत जेवण मिळू लागले.

विशेष निर्बंध कालावधीमुळे एक महिना ही थाळी पुर्णपणे मोफत देण्यात आली. त्यानंतर पुन्हा त्याची कालमर्यादा वाढविण्यात आली. आज (शुक्रवार) पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभाेजन थाळी माेफत देण्याची कालमर्यादा वाढवली. आता 14 जूनर्यंत शिवभाेजन थाळी माेफत मिळणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button