Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
मावळ विधानसभेत महायुतीच्या सुनिल शेळके यांचा दणदणीत विजय

मावळ : मावळ विधानसभा मतदारसंघात सुनिल शेळके यांचा दणदणीत विजय झाला आहे. मावळात महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेळके यांनी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा दारुण पराभव केला आहे. तळेगाव येथे मावळ मतदारसंघाची मतमोजणी पार पडली. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सुनिल शेळके हे मावळ विधानसभा मतदारसंघातून १ लाख ८ हजार मतांनी विजयी झाले आहेत.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी संपन्न होत आहे. मावळ मतदारसंघाची सकाळी 8 पासून मतमोजणी सुरु झाली. सुरुवातीपासून सुनिल शेळके हे प्रत्येक फेरीत आघाडीवर होते. शेळके हे शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.





