अंगणवाडी सेविका मानधनासाठी निधी

पुणे : अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी निधी अर्थसंकल्पित केलेला १६३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने मान्यता दिली आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते.
हेही वाचा – १ जानेवारीपासून ३ प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार? जाणून घ्या RBI चे नवीन नियम
केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे, याकरिता वित्तचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यामुळे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर २०२४ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिताचा मार्ग मोकळा झाला आहे.





