४७०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील फरार आरोपीस पुणे पोलिसांकडून अटक
![Fugitive accused in Rs 4700 crore scam arrested by Pune Police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Pune-Police-780x470.jpg)
पुणे : भारतातील सुमारे ६४ लाख लहान गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एका मुख्य आरोपीस पकडण्यास पुणे सीआयडीला यश आले आहे. तब्बल ७ वर्षानंतर आरोपीच्या मुसक्या बांधण्यात आल्या आहेत. समृद्ध जीवन ग्रुप नावाने कंपनीकडून, खोटी आश्वासने देऊन लाखो लोकांना गुंतवणूक करण्यास लावली होती. ४७०० कोटी रुपयांचा हा घोटाळा होता.
पुण्यासह राज्यातील उस्मानाबाद, जळगाव या जिल्ह्यांमध्ये आरोपी विरोधात गुन्हे दाखल आहे. २०१५ आणि २०१६ मध्ये पैशांची अफरातफर आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी समृद्ध जीवन या कंपनीच्या संचालकांवर करण्यात गुन्हे दाखल आले होते. रामलिंग हिंगे (वय ५६, रा. गोकुळनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महेश मोतेवार व रामलिंग हिंगे यांनी ही फसवणूक केली होती. या दोघे मुख्य आरोपी आहे. महेश मोतेवार अजूनही फरार आहे.
हेही वाचा – काँग्रेस नेत्याकडून सावरकरांचा अपमान; भाजपाचं विधानभवन परिसरात आंदोलन
कंपनीचे चेअरमन महेश मोतेवार आणि संचालक रामलिंग हिंगे गेल्या सात वर्षांपासून फरार आहेत. त्यातील रामलिंग हिंगे याला आता अटक झाली आहे. हिंगे सातारा रोडवरील सिटी प्राईडजवळ येणार असल्याची माहिती सीआयडीला मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.