breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

काँग्रेस नेत्याकडून सावरकरांचा अपमान; भाजपाचं विधानभवन परिसरात आंदोलन

नागपूर : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपूत्र प्रियांश खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटक विधानसभेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काठून टाकण्यात यावे, असे अवमानजनक विधान प्रियांक खर्गे यांनी केले होते. या वादग्रस्त वक्तव्यविरोधात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान म्हणजे समस्त क्रांतीकारक आणि देशभक्तांचा अपमान आहे. हा देश त्यांचे बलिदान नाकारू शकत नाही. इंदिरा गांधी यांनी स्वत: त्यांच्या बलिदानाचे समर्थन केले होते. पण, काँग्रेस आणि खरगे वारंवार सावरकरांना बदनाम करत आहे. ते महाराष्ट्रद्रोही असून त्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत. त्यामुळे या विषयावर उद्धव ठाकरेंनी जबाब द्यावा.

हेही वाचा  –  देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले..

आंदोलनात आशिष शेलार, बंडी भांगडिया, सुनील राणे, प्रवीण दटके, टेकचंद सावरकर, सीमा हिरे, मोनिका रानजळे, हरीभाऊ बागडे, नमिता मुंदडा, राजेश पाडवी, मंदा म्हात्रे, सुधीर गाडगीळ, राणा जगजितसिंग, उमा खापरे, राम कदम, समीर मेघे सहभागी होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button