Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सायबर चोरट्यांकडून आता…महापालिकेच्या नावानेही फसवे मेसेज

पुणे : महावितरण आणि एनएनजीएल पाठोपाठ आता महापालिकेच्या थकबाकीच्या नावाने एसएमएस करून नागरिकांना फसविण्याचे प्रयत्न सायबर चोरट्यांकडून सुरू आहेत. पाणीपट्टीची थकबाकी भरली नाही तर रात्री नळजोड तोडण्यात येणार असल्याचे सांगून संबंधित लिंकवर क्लिक करून तातडीने बिल भरण्याचे मेसेज नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. दरम्यान, अशा प्रकारचा कोणताही मेसेज पालिकेकडून पाठविण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांनी असे मेसेज आल्यानंतर पालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

शहरात शासकीय कार्यालयांच्या थकबाकीच्या नावाखाली नागरिकांना मेसेज पाठवून त्यांची बँक खाती रिकामी करण्याचा डाव सायबर चोरट्यांकडून आखण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे महावितरण तसेच एनएनजीएलच्या थकबाकीचे मेसेज नागरिकांना पाठविण्यात आले होते. त्यानंतर अनेकांनी या मेसेजला फसूून पैसेही भरले आहेत. आता, सायबर चोरट्यांनी महापालिकेच्या थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळविला आहे.

हेही वाचा – मूलभूत प्रश्न बाजूला सारण्यासाठी जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जातायेत का? जयंत पाटील यांचा सवाल 

महापालिकेकडून दरवर्षी शहरातील पाणीपट्टी थकबाकीदारांना मार्च महिन्यात, ३१ मार्चपूर्वी थकबाकी भरण्याचे मेसेज पाठविले जातात. याचाच गैरफायदा घेत सायबर चोरटे नागरिकांना नळजोड तोडण्याची भीती दाखवून, अशा प्रकारचे थकबाकीचे मेसेज आणि त्यासोबत लिंक पाठवत आहेत. याबाबत काही दक्ष नागरिकांनी तत्काळ महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास माहिती कळविली आहे.

प्रशासनाशी संपर्क साधा

नागरिकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या संदेशामधील लिंकवर क्लिक करून फसवणूक होण्याची शक्यता असल्याने, त्यांनी याबाबत अत्यंत दक्षता घ्यावी, अशा प्रकारचा मेसेज आल्यास, नागरिकांनी बिलावरील चॅटबॉट क्रमांक ८८८८२५१००१ वर संपर्क साधावा. महापालिकेच्या कॉल सेंटर क्र. १८००१०३२२२ वर संपर्क साधावा अथवा पालिकेच्या संबधित विभागातील मीटर रिडरकडे याबाबत माहिती घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button