दोन हजार दुचाकींचा विमा मोटारीच्या नावे उतरवून फसवणूक
![Fraud by taking insurance of 2000 two wheeler in the name of car](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/fraud-1.jpg)
आमदार भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूरअनंत राघू कचरे (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा), अजित अशोक सावंत (वय २९, रा. भाकरेवाडी, सोलापूर, सध्या रा. काळभोरनगर, पिंपरी-चिंचवड ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी स्वानंद जगदीश पंडित (वय ४१, रा. बंडगार्डन रस्ता) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आरोपींनी ऑनलाइन पद्धतीने वाहन प्रकारात बदल करून तीनचाकी, चारचाकी वाहने दुचाकी असल्याचे भासवून फसवणूक केली होती. त्यांनी दोन हजार २८६ मोठ्या वाहनांना दुचाकी वाहने दाखवून आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीची कोट्यवधीं रुपयांची फसवणूक केली होती तसेच शासनाकडे कर जमा न करता फसवणूक केली होती. पंडित विमा कंपनीत तपासणी अधिकारी आहेत. पंडित यांनी विमा पॉलिसीची तपासणी केली होती. तेव्हा त्यांनी एका दुचाकीचा क्रमांक पडताळून पाहिला होता. त्यावेळी दुचाकीचा वाहन क्रमांक टेम्पोच्या नावाने नोंदणीकृत असल्याचे उघडकीस आले.
विमा कंपनीने सखोल चौकशी केली. तेव्हा दलालांनी दोन हजार २८६ मोठी वाहने दुचाकी असल्याचे भासवून विमा काढला होता. दलालांनी मोटारचालकांकडून विमा उतरविण्यासाठी पैसे घेतले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी कचरे आणि सावंत पसार झाले होते. दोघांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी दिली.