Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल तीन दिवसांत खुला ; ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची माहिती

पुणे : ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल येत्या तीन दिवसांत सुरू झालेला दिसेल. त्याचे लोकार्पण मंगळवारपर्यंत होईल,’ अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी शनिवारी सरहद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली.

‘कोणताही औपचारिक कार्यक्रम आयोजित न करता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत,’ असे म्हसे यांनी सांगितले. हा उड्डाणपूल खुला झाल्यावर चौकातील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. पुणे महापालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत असलेली अनेक विकास कामे निर्णायक टप्प्यावर आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

म्हसे म्हणाले, ‘अतिशय गरीब वर्गासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून जवळपास दहा हजार घरे बांधण्यात आली आहेत. त्यातील चार हजार घरांचे वाटप करण्यात आले असून, साडेसहा हजार घरांच्या वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च महिन्यामध्ये ही सर्व कामे पूर्ण होतील.’

हेही वाचा –  भारत–पाकिस्तान महामुकाबला आज किती वाजता सुरु होणार? खेळपट्टी ते हवामानाच्या अपडेटपर्यंत, सामन्याची सर्व माहिती जाणून घ्या

पुण्याच्या भोवताली शहरीकरण वाढते आहे. एक लाखापासून पाच लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरालगतच्या सुमारे ५७ गावांची निवड करून, तिथे मलनिस्सारणाची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ‘अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम’चे काम हाती घेण्यात आले असून, सुमारे १२०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत या कामांचा कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) जाहीर करण्यात येईल,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेल्या इंद्रायणी, पवना आणि मुळा-मुठा या नद्यांची अवस्था सर्वांसमोर आहे. त्यांना नदी म्हणावे का, अशी परिस्थिती आहे. या तिन्ही नद्या प्रदूषणमुक्त करण्याचे काम हाती घेतले असून, त्यातील इंद्रायणी नदीसाठी सुमारे ७५० कोटी आणि पवना नदीसाठी २५० कोटी रुपयांची कंत्राटे काढण्यात आली आहेत. मुळा-मुठा नदीसाठी ९०० कोटी रुपयांचे कंत्राटासाठीची निविदा पुढच्या काही महिन्यांमध्ये प्रसिद्ध झाल्याचे दिसेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हिंजवडीपासून शिवाजीनगरपर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या एक किंवा दोन महिन्यांमध्ये ही मेट्रो सुरू झालेली दिसेल,’ असा विश्वास पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी व्यक्त केला.

डॉ. योगेश म्हसे म्हणाले…

  • येत्या तीन वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरालगत सुमारे साडेसहाशे किलोमीटर लांबीचे काँक्रीट रस्ते.
  • त्या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी १५ वर्षांसाठी पीएमआरडीएची.
  • पीएमआरडीएचे संपूर्ण काम ऑनलाइन पद्धतीने
  • प्रत्येक प्रकरण ब्लॉकचेनवर, तसेच निर्णयप्रक्रियेतही एआयचा वापर.
  • सगळ्या कंत्राटांची छाननी ‘एआय’च्या माध्यमातून
  • प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रत्येक प्रकल्पाची सद्य:स्थिती, त्याची प्रगती आणि दररोजची स्थिती.

‘पीएमआरडीएच्या सर्व कामांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे पाठबळ महत्त्वाचे आहे. दिवंगत अजितदादा पवार यांचे स्मरण करणे अत्यंत आवश्यक वाटते. प्रत्येक प्रकल्पाची ते पहाटे पाहणी करायचे. जिथे काही तरी चुकत असेल, त्या ठिकाणी दिशा देणे, मार्गदर्शन करणे, हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यातून संपूर्ण प्रशासनाला आणि पुण्यातील विकासकामांना एक वेगळी दिशा मिळाल्याचे दिसते,’ अशी भावना योगेश म्हसे यांनी व्यक्त केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button