आंबेगाव बुद्रुकमध्ये आयटी इंजिनीयरच्या घरी तब्बल पाच लाखांचा डल्ला
![Five lakh worth of IT engineer's house in Ambegaon Budruk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Five-lakh-worth-of-IT-engineers-house-in-Ambegaon-Budruk.png)
पुणे | शहरातील नवले पुलाजवळच्या करण समृद्धी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आयटी इंजिनीअरचा बंद फ्लॅट फोडून रोकड, सोन्याचे दागिने असा पाच लाख सहा हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीव जैन (वय ५५, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा घडला सर्व प्रकार…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन आयटी कंपनीत नोकरीला असून, गुरुवारी ते काही कामानिमित्त सकाळी सव्वानऊ ते सव्वादहाच्या सुमारास घराबाहेर गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून ७४ हजार रूपये, पाच लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने असा पाच लाख सहा हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन धामणे तपास करत आहेत.
कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू…
भरधाव कारची धडक बसून चिकन सेंटरमधील कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील झूम हॉटेल समोर बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेंटू कासिम शेख (वय ४०, रा. आर्यन चिकन सेंटर, भाडळे वस्ती, उरुळी देवाची) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.