Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
ईपीएफच्या व्याजदरात यंदा कोणताही बदल नाही
नवी दिल्ली – श्रीनगरमधील ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टच्या बैठकीत व्याजदराबाबत निर्णय घेण्यात आलाय. मनी 9 च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत 2020-21 च्या व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ते व्याजदर 8.5 टक्क्यांवरच स्थिर आहेत.
बोर्डाच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी मनी 9 ला सांगितले. ईपीएफओच्या वेगवेगळ्या स्रोतांच्या गुंतवणूक, त्यावरील उत्पन्न आणि कोविड यांच्या परिणामावर आधारित या समितीने व्याजदरासाठी आढावा अहवाल सादर केला. हे पाहता व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अंतिम निर्णय अर्थ मंत्रालयाने अद्याप घेतलेला नाही. ईपीएफओ बोर्ड आता आपल्या शिफारशी वित्तमंत्र्यांकडे पाठवणार आहे. त्यानंतरच त्यावर निर्णय होणार आहे.





