Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिकेकडून सर्वेक्षण मोहिमेवर भर; केंद्रीय पथकाकडून तपासणीला सुरुवात

पुणेः शहरातील गुइलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या दुर्मिळ आजाराचे रुग्ण पुणे शहरात सर्वाधिक आहेत. आता या आजाराचे रुग्ण सोलापूर आणि नागपूर शहरातही आढळत आहेत. पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदोशी, नांदेड, धायरी या गावांमध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोमचे जीबीएसचे रुग्ण अधिक सापडत असल्याने राजाराम पूल ते खडकवासला दरम्यान महापालिकेने हद्दीतील भागाला बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

बाधित क्षेत्रातील घरोघरी जाऊन महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यासाठी ८५ पथके नेमण्यात आली आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नयेत, यासाठी पथकांकडून जनजागृती केली जात असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार एका अधिकाऱ्याकडे २ ते ३ रुग्णालयांची जबाबदारी सोपण्यात आली आहे. रुग्णांची माहिती गोळा करणे, त्यांना कोणत्या योजनेत लाभ देता येईल याची माहिती घेतली जात आहे.

हेही वाचा  :  मौनी अमावस्येला महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी; अमृत स्नान रद्द 

तसेच या आजारावर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार दिले जात असून इंजेक्शन देखील मोफत दिले जात आहे. शहरी गरीब योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांवर सुमारे २ लाख रुपयांचे उपचार मोफत दिले जात आहे. जे रुग्ण शहरी गरीब योजनेत पात्र होत नाही, त्यांनाही एक लाखांची मदत महापालिकेच्या वतीने उपचारांसाठी केली जाणार आहे. या योजनेचा लाभ १३ जानेवारीनंतर दाखल झालेल्या रुग्णांना दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

ज्या भागात रुग्ण आढळून आले आहेत. त्या परिसरातील ४५ हजार ५२ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. याबरोबच खाजगी डॅाक्टरांनी जीबीएसचे रुग्ण आढळल्यास तातडीने आरोग्य विभागाला कळविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

पुण्यातील गुइलेन बॅरी सिंड्रोम आजाराच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ७ जणांचे केंद्रीय पथक काल पुण्यात दाखल झाले. पथकाने परिस्थितीचा आढावा घेतला आहे. जीबीएसची रुग्णसंख्या आणि त्यांच्यावरील उपचारांची माहिती या पथकाने घेतली आहे. त्यानुसार रुग्णसंख्या वाढण्याच्या नेमक्या कारणांचा शोध या पथकाने सुरू केला आहे. सिंहगड परिसरातील रुग्णसंख्या विहिरीतील दूषित पाणीच्यामुळे वाढली असल्याची सांगितले जात आहे. त्यानुसार आता या ठिकाणी देखील पथकाकडून पाहणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button