गिल बाहेर, रोहितसोबत ‘हा’ खेळाडू सलामीला येणार? दुसऱ्या वनडेसाठी अशी असू शकते भारताची प्लेईंग ११

Team India Playig XI Prediction: भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली होती. तर दुसरा सामना आज कार्डिफच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो. मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार शुबमन गिलने दमदार ८० धावांची खेळी केली होती. पण दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात गिल खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग ११? जाणून घ्या.
कर्णधार शुबमन गिल आणि वेगवान गोलंदाज गुरुनूर ब्रारच्या फिटनेसबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण पहिला वनडे सामना झाल्यानंतर तो प्रेझेंटेशनसाठी आला होता. त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, तो दुसरा सामना खेळताना दिसून येऊ शकतो. सामन्यावेळी अधिकृत माहिती दिली जाईल.
हेही वाचा – प्रथिनयुक्त नाश्ता : झटपट तयार होईल नाश्ता… 10 मिनिटांत तयार होणाऱ्या 5 आरोग्यदायी रेसिपी
सलामीला कोण येणार?
गिल दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला होता. त्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. जर गिलला विश्रांती दिली गेली, तर त्याच्याऐवजी इशान किशनला सलामीला फलंदाजी करण्याची संधी दिली जाऊ शकते. असं झाल्यास रोहित आणि इशानची जोडी डावाची सुरुवात करताना दिसू शकते.
पहिल्या सामन्यात गुरुनूर ब्रारने दमदार गोलंदाजी केली होती. पण ४८ व्या षटकात तो दुखापतीमुळे मैदान सोडून बाहेर गेला होता. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता, टीम मॅनेजमेंट त्याला खेळवण्याची रिस्क घेणार नाही. जर तो पूर्णपणे फिट झाला नाही, तर त्याच्या जागी अर्शदीप सिंग किंवा प्रिन्स यादवला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
दुसऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची संभावित प्लेईंग ११:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अर्शदीप सिंग/ प्रिन्स यादव , जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा.
या सामन्यासाठी अशी असू शकते इंग्लंडची संभावित प्लेईंग ११:
बेन डकेट, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक (कर्णधार), जो रूट, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, जोश टंग, आदिल रशीद/साकीब महमूद.





