breaking-newsताज्या घडामोडीपुणे

एमपीएससी आंदोलनात मतभेद? रोहित पवारांच्या उपस्थितीत काही विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे तर काही जण ठाम

पुणे : आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलनाला मोठे यश आले आहे. एमपीएससीच्या गुरुवारीच्या बैठकीत 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थी आपल्या इतर मागण्यांवर ठाम होते, परिक्षा पुढे ढकलल्यानंतरही ते आंदोलनाला बसले होते. मात्र, पोलिस उपायुक्त संदीप सिंह गील आमदार रोहित पवारांशी चर्चा केली. त्यानंतर आता आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत काही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले असल्याची माहिती आहे. तर काही जण अद्याप आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

मागील दोन दिवसांपासून सूरु असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर 25 ऑगस्टला होणारी परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. त्याचबरोबर कृषी विभागाच्या 258 जागांची भरती करण्याचे आश्वासन राज्य सरकारच्यावतीने देण्यात आले. या दोन मागण्या मान्य झाल्यावर आंदोलन करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र संयुक्त पुर्व परिक्षेच्या ‘गट ब आणि गट क’च्या पंधरा हजार जागा भरण्याची तिसरी मागणी देखील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. आता दोन मागण्या मान्य झाल्यावर रोहित पवार, रुपाली पाटील आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा    –      जनता फक्त निवडणूकीची वाट पाहतेय; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘आप’चा पाठिंबा 

संयुक्त पुर्व परिक्षेच्या माध्यमातून पंधरा हजार जागा भरण्याच्या तिसऱ्या मागणीबाबत येत्या सात दिवसांत शरद पवार मुख्यमंत्री आणि संबंधित व्यक्तींची भेट घेतील असं आश्वासन रोहित पवारांनी विद्यार्थ्यांना दिलं आहे. त्याचबरोबर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी देखील विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला आणि या तिसऱ्या मागणीचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित पवार, अभिमन्यू पवार यांचे प्रतिनिधी आणि रुपाली पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जोपर्यंत तिसऱ्या संयुक्त पुर्व परिक्षेची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय काही विद्यार्थी आणि युवक काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतला आहे.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, हे तुमचं आंदोलन आहे, पुढं न्यायचं हो तुमचा विषय आहे, उद्या मी मुख्यमंत्र्याची भेट घेतो, सरकारने परिक्षेबाबत योग्य निर्णय न घेतल्यास आयोगासमोर मी आंदोलनाला बसायला तयार आहे, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button