Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

..म्हणून मला झेड प्लस सुरक्षा दिली असावी; शरद पवारांना वेगळीच शंका

मुंबई | केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असेल. विधानसभा निवडणूक आणि शरद पवारांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरविल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या निर्णयावर शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे.

शरद पवार म्हणाले, गृहखात्याचे अधिकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की, देशात तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला आहे. मी विचारलं तीनमध्ये इतर दोन कोण आहेत? तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव सांगितले. मला कशासाठी सुरक्षा पुरविली हे माहीत नाही. कदाचित निवडणुका आहेत. त्यामुळे सगळीकडे फिरावे लागते. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळविण्याची व्यवस्था केलेली असावी. नक्की काय हे सांगू शकत नाही. पण गृहविभागाचे संबंधित अधिकाऱ्यांशी मी संवाद साधणार आहे. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरविणार आहे.

हेही वाचा    –      चार भिंतींच्या आत मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा; ठाकरे गटाची भूमिका  

दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र केंद्रीय सुरक्षा पुरविण्यात कोणतेही राजकारण दिसत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांचा दबदबा वाढत आहे. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने निर्णय घेतला असावा, असं रोहित पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या झेड प्लस सुरक्षेवर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे. शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे, ५५ CRPF त्यांना संरक्षण देणार. मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे?? बातमी वाचली आणि वाटलं की ५० वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय? असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button