Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुणे जिल्ह्याच्या ७ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर जमावबंदी लागू

पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश म्हणजेच १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. तसेच धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर,भोर तसेच वेल्हा या तालुक्यातील पर्यटनस्थळांवर ही जमावबंदी राहणार आहे. या सर्व तालुक्यातील भुशी डॅम लोणावळा डॅम, लवासा,टेमघर व मुळशी धरण परिसर,भीमाशंकर मंदिर,तोरणा किल्ला , राजगड किल्ला, खडकवासला धरण यासह अनेक पर्यटनस्थळांवर काही प्रतिबंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार पाण्यात उतरणे ,मद्यपान करणे , महिलांची छेडछाड आणि ध्वनी प्रदूषण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.