‘भारत जोडो यात्रे’साठी शक्तिस्थळांवरील मातीचे संकलन
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेसाठी पुणे शहरातील शक्तिस्थळांवरील मातीचे संकलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी करण्यात आले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक अभय छाजेड या वेळी उपस्थित होते.
शहरातील ऐतिहासिक व भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित शक्तिस्थळांवरील मातीचे संकलन आज करण्यात आले. त्यामध्ये लाल महाल, काँग्रेस भवन, मामलेदार कचेरी, समता भूमी, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, केसरीवाडा, संगमवाडी यांसह जिल्ह्यातील सिंहगड, वढू बुद्रुक, कोरेगाव भीमा आणि तळेगाव या स्थळांचा समावेश होता. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी, सुजित यादव, सचिन आडेकर, सुनील शिंदे, विजय खळदकर, अजित जाधव, रजनी त्रिभुवन, शिलार रतनगिरी, राहुल तायडे, राकेश त्रिभुवन, ऋषिकेश बालगुडे, अमर गायकवाड, रवि आरडे, हरिदास अडसूळ, दत्ता जाधव, योगेश बोर्डे या वेळी उपस्थित होते.





