Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल; जीएमआरटीचे स्थलांतर नाही: मंत्री अश्विनी वैष्णव यांचा महत्वपूर्ण निर्णय

पुणेः  पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्पात बदल करण्यात आला आहे. या रेल्वे प्रकल्प मार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) प्रकल्प येत असल्याने हा रेल्वे मार्गच बदलण्यात आला आहे. त्यामुळे पुणे, अहिल्यानगर, शिर्डीमार्गे नाशिककडे असा पर्यायी मार्ग म्हणून निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे आता जीएमआरटीचे स्थलांतर केले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी घेतला. त्यांनी शनिवारी पाषाण येथील सी डॅक संस्थेला भेट दिली. तसेच मध्य रेल्वे विभागातील कामकाज आणि प्रकल्पांचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा –  पीएमआरडीएचा कारभार होणार पेपरलेस

जीएमआरटी प्रकल्प भारतासाठीच नाही तर २३ देशांसाठी महत्वाचे वैज्ञानिक केंद्र आहे. या केंद्राचे स्थलांतर करणे म्हणजे भारतातील सर्वांत शक्तीशाली केंद्राची क्षमता कमी करणे होईल, असे ते म्हणाले. यामुळे जीएमआरटी प्रकल्पाला धक्का न लावता पुणे-नाशिक नवीन रेल्वेमार्गाचा नवा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार हा रेल्वेमार्ग पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक असा असणार आहे, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले. तसेच रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राकडे विशेष लक्ष दिले आहे. जवळपास ७० हजार कोटी रुपयांची विकास कामे सध्या सुरू आहेत. त्यातही रेल्वेच्या पुणे विभागात मोठी विकासकामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे ते लोणावळा या तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल, असे वैष्णव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button