मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ग्रॅन्ट्री बसविण्यासाठी उद्या ब्लॉक
![Block tomorrow for installation of grantries on Mumbai-Pune expressway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Mumbai-Pune-expressway-2-780x470.jpg)
पुणे | यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी ५६.९००, कि.मी ६३.००० व कि.मी ७३.२५० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक बंद राहील.
वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. पुणे ते मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे पुलावरुन सर्व प्रकारची वाहने जुना मुंबई-पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात येतील. तसेच जुना पुणे ते मुंबई मार्गाने येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका येथून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.