Breaking-newsराष्ट्रिय

इंधन दरवाढीला १७व्या दिवशी ब्रेक ; पेट्रोल ६० पैसे तर डिझेल ५६ पैशांनी स्वस्त

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सुरु झालेली इंधन दरवाढ अखेर आज संपुष्टात आली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घसरण झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत ६० पैसे प्रति लिटर तर डिझेलच्या किंमतीत ५६ पैसे प्रति लिटरची कपात करण्यात आली आहे.

या दरकपातीमुळे देशातील कोट्यवधी जनतेला अल्पसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान मंगळवारी लखनऊ येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी डॉलर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट केले होते. दिल्लीत आज पेट्रोलचा दर ७७.८३ रुपये प्रति लिटर असेल. तर डिझेलचा दर ६८.७५ रुपये प्रति लिटर इतका असेल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button