Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पावसात भाजपच्या छत्र्यांना लागली गळती; पुण्यात काॅंग्रेसकडून होतेय दुरुस्ती

पुणे |महाईन्यूज|

पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये आयोजित केलेल्या छत्री दुरुस्ती कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हे राजकीय पक्षाचे काम आहे का? इथपासून काँग्रेसचं छत्र हरवलंय अशी खिल्ली उडवली जात आहे.

या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस समर्थकांकडून दिली जात आहे. अशातच भाजपच्या वतीने वाटलेल्या छत्र्यांपैकी एक छत्री येथे दुरुस्तीसाठी आल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान शनिवार पेठेतील गिरीश बापटांच्या मतदारसंघातूनच एकजण काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती कार्यक्रमात भाजपची छत्री घेऊन आल्याने या विषयावरील चर्चेला उधाण आलं आहे. येवढचं काय तर एक पुणेकर उन्हापासून संरक्षण करणारी मोठी छत्री, जी सर्वसाधारणपणे बीच वा हॉटेलात ठेवली जाते, तीदेखील घेऊन आला. कोणत्याही राजकीय पक्षाने पहिल्यांदाच असा उपक्रम राबविला असल्याची चर्चा सध्या पुण्यासह राज्यभरात सुरू आहे. अनेक समर्थकांनी तर काँग्रेस तळागाळातील लोकांचा विचार करीत असल्याने असा उपक्रम राबवल्याचा दावा केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button