अजित पवारांकडून बारामतीत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी; सेंट्रल पार्क येथील कामाबाबात दिले महत्वाचे निर्देश

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूडची बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर आज आपण बारामती आणि त्यानंतर नांदेड दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे. त्यानुसार अजित पवार यांनी बारामतीमधील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. सेंट्रल पार्क परिसरात नागरिकांना बारामतीचा बदलता इतिहास, ऐतिहासिक प्रसंग आदी बाबी मोठ्या आकाराच्या पडद्यावर दाखविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.
बारामतील शहरातील तीन हत्ती चौक परिसर सुशोभिकरण, कुस्ती महासंघ शेजारील कामाची अंतिम करणे, कुस्ती महासंघ ते घारे साठवण तलाव दरम्यान कॅनाल परिसर, घारे साठवण तलाव सुशोभीकरण आणि पदपथाचे काम, सेंट्रल पार्क सुशोभीकरण येथे सुरू असलेल्या कामांची पाहण करत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी अजित पवार यांनी मी सुचवलेली कामे दर्जेदार झाली पाहिजेत. नागरिकांची कुठलीही तक्रार येता कामा नये, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
हेही वाचा – सांगलीत महास्वच्छता अभियानात ४ टन कचरा संकलित
यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी पंकज भुसे आदी उपस्थित होते. आज त्यांनी भल्या पहाटे शहरातील विविध विकास कामांना भेटी दिल्या आहेत. बारामतीचा पाहणी दौरा आटोपून अजित पवार नांदेड दौऱ्यावर जाणार आहेत.