Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी सुरेंद्रकुमार अगरवाल यांच्यावर गुन्हा

पुणे : बाउन्स झालेल्या चेकच्या कारणातून व्यावसायिक संबंध असलेल्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये बोलावून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुरेंद्रकुमार अगरवाल यांच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एम.जी रस्त्यावरील ब्रह्मा मल्टीकॉन कंपनीच्या कार्यालयात गुरुवारी (दि.२९) सायंकाळी ही घटना घडली. कल्याणी नगर येथील पोर्शे अपघात प्रकरणात सुरेंद्र यांना अटक झालेली होती.
हेही वाचा – महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
याबाबत विद्यासागर सेलवराज सिंगाराम (वय ३७, रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लष्कर पोलिसांनी अगरवाल यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २९६, ३५२, ३५१ (२), १२७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.





