ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

प्रत्येक मुस्लिम दहशतवादी नाही : पण, प्रत्येक दहशतवादी मुस्लिम कसा काय?

नागपूर शहरात विनाकारण दंगल पेटली. गेले आठवडाभर महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांमध्ये समुद्रमंथन सुरू असून औरंग्याच्या कबरीवरून उलट सुलट येणाऱ्या बातम्यांमुळे नागपूरमध्ये तणाव वाढला आणि त्याचा शेवट तेथील भीषण दंगलीमध्ये झाला. अनेक नेत्यांनी याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि उगीचच मुस्लिमांना वेठीस धरू नका, अशा सूचना केल्या गेल्या. तरीपण एक प्रश्न उपस्थित होतो, की प्रत्येक मुस्लिम हात दहशतवादी नसतो, हे मान्य..पण, सापडणारा प्रत्येक दहशतवादी हा मुस्लिम कसा असतो ?

मुख्य ‘टार्गेट’ पोलीस आणि हिंदूंची घरे..

अतिशय वाईट पद्धतीने ही दंगल झाली, त्यामध्ये हिंदूंच्या घर, गाड्यांबरोबरच पोलिसांना देखील ‘टार्गेट’ केले गेले आणि बरेच पोलीस जखमी आहेत, बऱ्याच जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. कुठेही झालेली जातीय दंगल हा अत्यंत निषेधार्थ आणि क्लेशदायक प्रसंग आहे! शांतताप्रिय समाजाला आणि आपल्या महाराष्ट्राला दंगलीच्या वेदना पुढील कित्येक वर्षे होत असतात, हे महत्त्वाचे !

नागपूरची दंगल पूर्वनियोजितच!

या निमित्ताने दुसरा एक विचार मनात येऊन जातो. महाराष्ट्रामध्ये ‘महायुती’ चे सरकार सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडीचे काहीतरी कारनामे सुरू आहेतच. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यामुळे तर अनेकांचा पोटशूळ उठला आहे, उघडपणे ते जातीयवादी उल्लेख करून फडणवीस यांचे खच्चीकरण करीत आहेत.

राज्यातील अशांततेसाठी वाटेल ते..

आपला महाराष्ट्र अशांत करण्यासाठी म्हणूनच कधी लाडक्या लेकींना भडकावले जाते, कधी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते. प्रचंड गुंतवणूक होत असून देखील युवकांना बेरोजगारी ठरवून सरकारला बदनाम केले जाते. थोडक्यात काय, जनतेने ‘महायुती’ ला भरभरून दिलेला कौल सहन न झाल्यामुळे बेछूट आणि बेताल वक्तव्ये करून विकासाच्या वाटेवर असलेला महाराष्ट्र अशांत करण्याचा कट रचला जात आहे. अशा प्रकारच्या दंगली भडकल्या तर अस्थिर झालेल्या महाराष्ट्रात गुंतवणूक कशी होईल? विकास रखडला जाईल, अशी कारस्थाने केली जात आहे, हे निश्चित !

हेही वाचा  : गोरगरिब रुग्णांच्या अर्थसहाय्यासाठी आमदार लांडगे सरसावले!

दंगलीसाठीच औरंग्याचे उदातीकरण !

दंगली घडवण्याच्या कटाचा एक भाग म्हणून आता औरंग्याचे उदात्तीकरण सुरू झाले आहे. मुस्लिमांच्या तुष्टिकरणासाठी झाडून सगळे ‘आघाडी’चे नेते औरंग्याची पालखी उचलायला तयार झाले आहेत. त्यांना माहीत आहे की ‘महायुती’ सरकार छत्रपती शिवरायांच्या तत्त्वांवर आणि भूमिकेवर राज्य कारभार करीत आहे. हे असेच सुरू राहिले तर पुढील कित्येक वर्षे या महाविकास आघाडीला सत्तेची खुर्ची मिळणे महाअवघड जाणार आहे, त्यामुळेच अशा कारस्थानांचा हा प्रपंच !

महाराष्ट्रापेक्षा देवेंद्रचे शहर अशांत करा..

संपूर्ण महाराष्ट्र अशांत करण्यापेक्षा फडणवीस यांच्या गावातच त्यांना कोंडीत गाठण्याची कल्पना या ‘आघाडी’ ने अमलात आणलेली दिसते. त्यातूनच त्यांनी दंगलीसाठी नागपूरची निवड केली आणि अचूक संधी साधली. या कटाचा एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून नटद्रष्ट अबू आझमी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली विधाने आणि नागपूरमध्ये झालेला प्रकार यातून एक प्रश्न नक्की मनात येतो, की महाराष्ट्र अशांत करण्याची ही पूर्वनियोजित दंगल आहे आणि देवेंद्र यांच्या शहरांमधूनच राज्य असंतुष्ट करण्याचे मुद्दे पुढे आणले जात आहेत.

औरंग्याचा रक्तरंजित इतिहास..

देवदेवतांच्या आशीर्वादाचे शिंपण असलेल्या महाराष्ट्राच्या पवित्र मातीला औरंग्याने रक्ताने माखण्याचा प्रयत्न केला, येथील अनेक पवित्र ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला. ज्या क्रूर औरंग्याने महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, हिंदूंवर भयानक अत्याचार केले, त्या औरंग्याबद्दल विरोधी पक्षांना एवढा पुळका असणे, किती धोकादायक आहे, याची प्रचितीच नागपूरच्या दंगलीतून दिसून येते. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव होण्यामुळे ज्या नेत्यांचे पोट दुखले, आम्ही औरंगाबादच म्हणणार, अशी भीमगर्जना ज्यांनी केली, तेच नेते आज महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप म्हणूनच होत आहे.

पाहा, तर नागपूर मध्ये काय घडले?

‘औरंग्याच्या कबरीविरोधी सुरू असलेले आंदोलन चिघळले आणि सोमवारी रात्री नागपुरात दोन गट भिडले. अपेक्षेप्रमाणे तणाव वाढला, दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर परस्परांवर दगडफेक झाली, अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली आणि संतप्त जमावाच्या दगडफेकीत अनेक पोलीस जखमीही झाले.

पेट्रोल बॉम्ब आणि तुफान दगडफेक..

यावेळी पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले आणि रस्त्यावर लावलेल्या अनेक गाड्या फोडण्यात आल्या. या गाड्या हिंदूंच्याच आहेत, हे पाहून त्यावर हल्ले चढवण्यात आले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. म्हणूनच ही पूर्वनियोजित दंगल होती, असे म्हणण्याचे धाडस करावे वाटते.

प्रचंड राडा, जाळपोळ आणि दगडफेक

नागपूर शहरातील महाल परिसरात दोन गटांत हा राडा झाला. बाजूच्या मुस्लिम वस्त्यांमधील जमाव महालच्या शिवाजी चौकात आला. या जमावाने घोषणाबाजी करताच, दोन्ही गट एकमेकांविरुद्ध आक्रमक झाले. दोन्हींकडून परस्परांवर दगडफेक करून गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली. तणाव निवळण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्यामुळे तणावात भर पडली. हिंसक जमावाचा रोख आणि रोष विश्व हिंदू परिषदेने दुपारी केलेल्या आंदोलनासंदर्भात होता.

दोन्ही बाजूंनी तुफान घोषणाबाजी!

घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकलले. यानंतर दोन्ही गटांत तुफान राडा झाला आणि दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली. पोलीस आयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला होतो, याला काय म्हणावे?

शांतताप्रिय नागपूरला गालबोट..

नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे, त्यालाच गालबोट लागावे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूर मधील रहिवासी आहेत, त्यांना बदनाम करता करता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूरमध्ये असल्यामुळे त्यांच्यावरही आरोप करता येतील, असे काहीतरी समीकरण समाजकंटकांनी मांडलेले असावे. आता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिशय कठोर पावले उचलावीत, आणि राज्यातील दंगलखोरांना आळा बसण्यासाठी नागपूरमध्ये अटक केलेल्यांची यादी जरी जाहीर केली, तरी संपूर्ण जनतेला दंगलीची वस्तुस्थिती माहीत होऊ शकेल. देवेंद्रजी, चौकशी होईलच, पण ही यादी जाहीर कराच !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button