‘आम्हाला नडला तर तोडणारच’ म्हणत तरुणावर जीवघेणा हल्ला, 5 जण अटकेत
पुणे | आम्हाला नडला तर तोडणारच असे म्हणत तरुणावर पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला करण्यात आला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भेकराईनगर मध्ये 14 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत पाच जणांना अटक केली आहे.कृष्णा उर्फ चिक्या सुभाष बाळूरगी (वय 20), रुपेश विनोद धोत्रे, अतुल जाधव, अथर्व शिंदे, आणि राहुल राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे. त्याप्रकरणी कविता प्रभाकर रुके (वय 40) या महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर च्या रात्री फिर्यादी चा मुलगा हा मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांनी या तिच्या मुलाला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने वार केले. अश्लील भाषेत शिवीगाळ करीत ‘बघा याला कसा तोडला, आम्हाला नडला त्याला असेच तोडणार’ असे म्हणत हवेत कोयते नाचवून परिसरात दहशत निर्माण केली. प्रेक्षक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.





