ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा अनोखा उपक्रम; ४,००० महिलांना मोफत ‘किचन गार्डन किट’ व आधुनिक सेंद्रिय शेती मार्गदर्शन!

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी क्रांतिकारी ‘महिला शेतकरी बिल’ आणले.

या ऐतिहासिक धोरणात्मक निर्णयावरून प्रेरणा घेऊन आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरी भागातील महिलांना गृह-कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करणारा एक नाविन्यपूर्ण प्रयोग आता प्रत्यक्षात साकारत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण यांच्या खंबीर नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकर भाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमितजी गोरखे, माजी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग. दी. माडगूळकर प्रेक्षागृह, लहान हॉल, येथे दि. 24 जुलै 2026 शुक्रवार रोजी, सकाळी कार्यक्रम घेण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांनी दिली.

या अंतर्गत शहरी जिल्ह्यातील ४,००० महिलांना घरच्या घरी विषमुक्त शेती करण्यासाठी ‘किचन गार्डन किट’चे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

महिला शक्तीच्या कल्पकतेला मानाचा मुजरा देणारा हा प्रयोग शहरात एक नवी सेंद्रिय क्रांती घडवेल.

हेही वाचा –  ‘महाराजस्व शिबिरा’तून शिवरायांच्या विचारांची प्रत्यक्षात अंमलबजावणी’; आमदार शंकर जगताप

प्रमुख वैशिष्ट्ये व उपक्रम:तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन सत्र:

शहरी भागातील मर्यादित जागेत (उदा. बाल्कनी, गच्ची) उत्तम प्रकारे भाजीपाला कसा पिकवावा, यासाठी सोहळ्यात नामांकित नर्सरीचे तज्ज्ञ, हायड्रोपोनिक्स कन्सल्टंट आणि कृषी विभागाच्या शहरी विभागातील अधिकाऱ्यांमार्फत महिलांना आधुनिक गृह-कृषीचे सखोल मार्गदर्शन केले जाईल.

‘किचन गार्डन’ किट वाटप: महिलांना एका पर्यावरणपूरक आणि आकर्षक कापडी पिशवीतून ५ प्रकारच्या भाज्यांची उच्च दर्जाची हायब्रीड बियाणे, सेंद्रिय खताची छोटी पिशवी आणि पाण्याचे छोटे स्प्रेअर (कारंजे) दिले जाणार आहे. या पिशवीवर सन्माननीय ‘देवाभाऊ’ यांच्या फोटोसह ‘भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश’ असे प्रामुख्याने मुद्रित करण्यात आले आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून, लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त साकारत असलेल्या या भव्य सोहळ्याला परिसरातील सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजप महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button