पुण्यात एकाच दिवशी 2 आगीच्या मोठ्या घटना; अग्निशमन दलाची पुरती दमछाक, अनेकांचे संसार उद्ध्वस्त

पुणे : पुण्यातील चंदनगर परिसरात भीषण आग लागून जवळपास 10 हुन अधिक सिलेंडर फुटल्याची घटना घडली आहे. या आगीत जवळपास 50 झोपड्या जळाल्या आहेत. ही घटना चंदनगर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी येथे पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंदनगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी आहे. येथे पहाटे 5 वाजता भीषण आग लागून जवळपास सात ते आठ सिलेंडरचा या आगीत स्फोट झाला आहे. तर 50 च्यावर झोपड्या जाळून खाक झाल्या आहेत. नागरिकांच्या रोज वापरतील वस्तुचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आगीवर सद्यस्थितीत नियंत्रण मिळवले असून शंभर हुन अधिक सिलेंडर बाहेर काढले आहेत. दरम्यान या घटनेत जखमी कोणी नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. पहाटेच्या सुमारास आग लागल्याने अनेक लोक या झोपडपट्टीमध्ये अडकली आहेत. सध्या त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, साखर झोपेत असतांना अनेकांना काही कळायच्या आता आगीने भडका घेतल्याने अनेकांची पूर्ती धांधल उडाली आहे.
हेही वाचा – ‘हातात बंदूक अन् पर्यटकांना मारण्याची घाई…’ ; पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर
बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या शेजारील जुन्या वाड्याला आग लागल्याची घटना घडली. ही घटना बुधवारी मध्यरात्री एक वाजून सहा मिनिटांनी घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सहा बंब आणि सहा पाण्याच्या टँकरसह दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जवानांनी तत्परतेने आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले.
मध्यरात्री दोन वाजेपर्यंत अग्निशामक दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.