१५ ऑगस्टपासून मेट्रो दर सहा मिनिटांनी धावणार
पुणेकरांची मेट्रो ट्रेनमधील गर्दीपासून होणार सुटका
पुणे : पुणे मेट्रोबाबत एक मोठी अपडेट आली आहे. सध्या गर्दीच्या वेळेत म्हणजेच ९ ते ११ आणि ४ ते ८ या कालावधीत दर सात मिनिटाला एक ट्रेन अशी सेवा पुणे मेट्रोतर्फे सेवा उपलब्ध आहे. मात्र आता येत्या १५ ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर सहा मिनिटाला प्रवाशांना सेवा देणार आहे. तर विना गर्दीच्या वेळी मात्र दर १० मिनिटाला एक ट्रेन असणार आहे.
सध्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिका मिळून ४९० फेऱ्यांद्वारे मेट्रो सेवा पुरवत आहे. दर सहा मिनिटाला ट्रेन सेवा यामुळे अधिक ट्रेनच्या ६४ फेऱ्या वाढणार आहेत. यामुळे १५ ऑगस्टपासून एकूण ५५४ फेऱ्या होणार आहेत. अधिकच्या ६४ फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही.
हेही वाचा : सामाजिक विषमता दूर करण्याची जबाबदारी युवा पिढीवर; डॉ. वंदना बोकील
जुलै मध्ये मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला असून, दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ९२ हजारांपर्यंत वाढली आहे. तसेच ऑगस्टमध्येही प्रवासी संख्येत निरंतर वाढ होताना दिसत आहे. आजपर्यंत प्रवाशांची सरासरी संख्या २,१३,६२० निदर्शनास आली आहे.





