हळदीच्या कार्यक्रमाला निघालेला टेम्पो कात्रज – देहू महामार्गावर पलटी
पुणे |महाईन्यूज|
कात्रज-देहु बाह्यवळण महामार्गावर त्रिमूर्ती मंगल कार्यालयासमोर एक टेम्पो पलटी झाल्याने आठ जण जखमी झाले आहेत.हा अपघात रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, टेम्पो मधून काही प्रवासी लग्नासाठी जात असताना डी-मार्ट जवळ आल्यावर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकामध्ये टेम्पो पलटी झाला. यामधील आठ प्रवासी जखमी असल्याचे समजते आहे अपघातातील जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक विभाग व भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक कोंडी तातडीने सुरळीत केली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत आहे.
दरम्यान, नवले पुल ते कात्रज चौकापर्यंत सहा पदरी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने ह्या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत आहे. महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.





