breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सारथी संस्थेतल्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ खासदार संभाजीराजेंचे उपोषण

पुणे | पुण्यातल्या सारथी संस्थेतल्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ खासदार संभाजीराजे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा तरुणांना शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य करणारा सारथी उपक्रम बंद करायचा डाव असल्याचा आरोप करत, संभाजीराजे यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. पुण्यातील सारथी संस्थेसमोर ते उपोषण करणार आहेत. संभाजीराजे यांनी नुकतीच यासंदर्भातील माहीती दिली.

संभाजीराजे सारथी संस्थेसाठी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे कळताच, महाराष्ट्रातील हजारो युवकांनी आणि समाज धुरीणांनी पाठिंबा देत आहेत. हजारो लोक उद्या पुण्याच्या दिशेने येण्याच्या तयारीत आहेत. समाजमाध्यमातून अनेकजण पाठिंबा देत आहेत. सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील तरुणांच्या हक्कासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे. गेले अनेक दिवस मी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे, विशेष म्हणजे या संस्थेचे उदघाटन माझ्या अध्यक्षतेखालीच झाले होते. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो.

त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता. त्यानंतर,लगेच मी सारथी च्या पुण्यातील कार्यालयात जाऊन, दोन्ही बाजूंची भूमिका समजुन घेतली आणि सरकार स्थिरस्थावर होईस्तोवर कुठलाच नवीन आदेश न काढण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु जे पी गुप्ता हे प्रधान सचिव दररोज नवीन आदेश काढून संस्थेला बदनाम करत असल्याचे दिसून येत असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button