शारदा गणपती मंदिरातून 25 तोळे सोन्याचे दागिने चोरीला!
![शारदा गणपती मंदिरातून चोरी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/1Mandai_20Ganpati_20will_20be_20installed_20in_20the_20temple_20for_20the_20first_20time_20in_20127_20years.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुणे शहरातील प्रसिद्ध गणेश मंडळापैकी एक अशा शारदा गणपती मंदिरात (pune sharda ganpati mandir) चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी 22 ते 25 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
पुणेकरांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या गणेश मंदिरात चोरी झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/download.jpg)
शहराच्या मध्यवस्तीत शारदा गणेश मंदिर आहे. प्रसिद्ध अश्या एक गणेश मंडळापैकी एक आहे. ऐन मध्यवस्तीत हे मंदिर आहे. दरम्यान मध्यवस्तीत सहसा मध्यरात्री देखील गर्दी असते. तर पोलिसांची गस्त देखील. पण या परिस्थितीत देखील चोरट्यांनी मध्यरात्री मंदिरात प्रवेश करून आतील दागिने आणि रोकड चोरून नेल्याचा प्रकार पहाटे समोर आला. त्यानंतर पोलिसांनी माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच घटनास्थळी विश्रामबाग पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक चोर दागिने काढून घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा शोध घेतला आहे.