breaking-newsपुणे

महात्मा गांधी यांचे दुर्मिळ फुटेज एनएफआयच्या खजिन्यात

महात्मा गांधी यांच्यासंबंधी असंपादित चित्रण असलेली तीस रिळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाली असून सुमारे सहा तासांचा कालावधी असलेल्या या रिळांमध्ये महात्मा गांधी यांच्या काही दुर्मीळ आठवणींचा खजिना आहे. या पस्तीस एमएम सेल्युलॉइड  फिल्म्सचे चित्रीकरण पॅरामाऊंट, पाथे, वॉर्नर, युनिव्हर्सल, ब्रिटिश मुव्हिटोन, वाडिया मुव्हिटोन या एकेकाळच्या नावाजलेल्या स्टुडिओजकडून करण्यात आले आहे.

येत्या दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी होत आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, या फिल्म्स रिळांमधील काही चित्रण यापूर्वी काही लघुपट आणि माहितीपटांत दिसून आले आहे. मात्र काही क्षणचित्रे दुर्मीळ आहेत. महात्मा गांधी यांची रक्षा घेऊन जाणाऱ्या मद्रास ते रामेश्वरम् या खास रेल्वेचे चित्रण आहे. तामिळनाडू राज्यातून ही रेल्वे जात असताना मार्गावरील चेट्टीनाड, शिवगंगा, चिदंबरम, मदुराई या प्रमुख रेल्वेस्थानकावर तसेच मरीना समुद्र किनाऱ्यावर अस्थींचे दर्शन घेण्यासाठी हजारो शोकाकुल लोकांनी केलेली गर्दी पाहावयास मिळते. एका चित्रणामध्ये म. गांधी यांनी १९४६ मध्ये जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात केलेल्या दक्षिण भारताच्या दौऱ्याचा तसेच हरिजन यात्रेचा समावेश आहे.

वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी आणि कस्तुरबा विविध काम करताना चित्रित करण्यात आलेली दृश्येही पाहावयास मिळतात. त्यामध्ये महात्मा गांधी नांगरताना, वृक्षारोपण करताना तर कस्तुरबा गायींना चारा घालतानाची दृश्ये आहेत. दुसऱ्या एका रिळात महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी जाताना राजपुताना ते इंग्लंड असा त्यांचा बोटींमधील प्रवास क्षणचित्रांमधून दाखविण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button