breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात सहा वर्षीय मुलगा दोनशे फूट बोअरवेलमध्ये पडला, त्याला वाचविण्यासाठी एनडीआरएफ केले पाचारण

पुणे  –  पुण्यात एक सहा वर्षीय मुलगा दोनशे फूट खोल बोअरवेलमध्ये पडला आहे. पुण्यातील आंबेगावात साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुलाला वाचवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण केले असून महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून थांबले आहेत. त्या मुलाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

रवी पंडित मिल असं या मुलाचं नाव आहे. तो बोअरवेलमध्ये नेमका कसा पडला, याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही. बोअरवेल 200 फूट खोल असला तरी सुदैवाने रवी हा फक्त 10 फुटांवर अडकला आहे. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. उघडे बोअरवेल ही मोठी समस्या आहे. याअगोदरही मुलं खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आंबेगावातील घटनेचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं असून स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button