पुण्यात दाढी-कटिंग दर वाढणार, १ जानेवारीला होणार अमंलबजावणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/70.jpg)
पुणे |महाईन्यूज|
जीवनावश्यक वस्तूंसोबत सलून साहित्याचे दर वाढल्यामुळे कटिंगच्या दरात २० रुपये, तर दाढीच्या दरात १० रुपये दरवाढ करण्याचा निर्णय़ महाराष्ट्र नाभिक महामंडळाने घेतला असून त्याची अंमलबजावणी पुणे शहरात १ जानेवारी २०२० पासून करण्यात येणार आहे, अशी माहिती नाभिक महामंडळाचे पुणे शहर अध्यक्ष महेश सांगळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
नाभिक महामंडळ आणि पुणे नाभिक सेवा संघ यांच्यासोबतच पुणे शहरातील सर्व नाभिक संघटना यांची संयुक्त दरवाढ आणि इतर सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक पार पडली. या बैठकीत जनार्दन दगडू पांडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नव्या दरांचे दरपत्रक पुणे शहरातील सलून व्यावसायिकांना लवकर देण्यात येतील, असे सांगळे यांनी सांगितले. या वेळी नीलेश पांडे, बाळासाहेब कर्वे, विनायक साबळे आदी मान्यवरांसोबत पदाधिकारी उपस्थित होते.