Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

महापोर्टल बंद करा, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

मुंबई – राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. यासाठीच राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तरूणाईंचा हाच मुद्दा घेऊन थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. शासकीय नोकरभरतीसाठी सुरू करण्यात आलेले महापोर्टल बंद करण्याची मागणी यावेळी सुळेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

नोकरभरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या महापोर्टलमधील गैरकारभारामुळं तरूण त्रस्त झालेत. त्यातच बेरोजगारीनं राज्यात डोकं वर काढलं आहे. म्हणून तरूणांचा हा मुख्य प्रश्न घेऊन सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांकडे गेल्या.

गेल्या महायुती सरकारनं महापोर्टल सेवा सुरू केली होती. मात्र या सेवेत पारदर्शकता नसल्याची तक्रार स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सातत्यानं करण्यात येत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. शासकीय नोकरभरतीसाठी यापुर्वीच्या सरकारने सुरु केलेले महापोर्टल बंद करावे,अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली.या सेवेत पारदर्शकता नाही अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होतोय.त्यामुळे ते बंद व्हावे ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं सुप्रिया सुळेंनी यांनी सांगितलं. 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button