पुणे पदवीधर मतदारसंघात पुन्हा विजय मिळवण्यासाठी पुणे ग्रामीण भाजपा सज्ज : गणेश भेगडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/1605690033632.jpg)
सासवड | प्रतिनिधी
पुणे विभाग मतदारसंघाचे भाजप व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या पुणे जिल्हा ग्रामीणच्या प्रचार दौऱ्याचा शुभारंभ आज सासवड / पुरंदर याठिकाणी करण्यात आला.
पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद नसताना तो मतदारसंघ आपण अनेक वेळा काबीज केला आहे आता तर आपली ताकद पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आपल्या उमेदवारचा विजय तर निश्चितच आहे. पण आपल्याला काठावरचा विजय नको जवळपास तीस हजाराच्या मताधिक्क्याने आपला विजय होईल, असा विश्वास देखील पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना श्री संग्राम दादांना विजयी करण्याचे आवाहन यानिमित्ताने केले व सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा संघटन सरचिटणीस ऍड. धर्मेंद्र खांडरे, सरचिटणीस सुदर्शन चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, राहुलदादा शेवाळे, युवा मोर्चा अध्यक्ष नगरसेवक किरण दगडे पाटील, पुरंदर तालुका अध्यक्ष आर एन भाऊ जगताप, हवेली मध्य अध्यक्ष धनंजय कामठे, जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस ऋतुजाताई जाधव, मैनाताई जाधव, वैशालीताई पवार, अल्काताई शिंदे, साकेत जगताप, सचिन पेशवे, श्रीकांत थिटे, श्रीकांत ताम्हाणे, सचिन लांभाते, गिरीषअप्पा जगताप व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.