Breaking-newsपुणे
पिंपरीत पुन्हा दोन टेम्पो फोडले
पिंपरी : शहरातील वाहनांच्या तोडफोडीचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी मध्यरात्री चिखली येथील घरकुल परिसरामध्ये दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, घरकुल परिसरात राहणारे बाळासाहेब दगडे यांचा एमएच-१२-एफ.झेड.-३८२२ आणि शेख यांचा एमएच-१४-व्ही-१५१३ हे दोन टेम्पो घरकुल परिसरात उभे होते. मध्यरात्री अज्ञातांनी या दोन्ही टेम्पोच्या काचा फोडल्या. याबाबत कोणतीही तक्रार निगडी पोलिस ठाण्यात देण्यात आलेली नाही. घरकुल परिसरात वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.