Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारराष्ट्रिय

शेअर बाजारात जोरदार तेजी

मुंबई – आशियाई शेअर बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आज सकाळी मुंबई शेअर बाजारात जोरदार तेजीचे वातावरण होते. त्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ११७ अंकांनी वाढल्यामुळे त्याने ३८ हजारांचा टप्पा ओलांडला होता. निफ्टीतही ५५ अंकांची वाढ झाल्यामुळे निफ्टी ११,१०० वर गेला होता.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी काल सोमवारी बँकांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव होता. तो आजही कायम होता. मात्र आयटी कंपन्यांच्या समभागांतील खरेदीमुळे बाजारात तेजी आली होती. जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, टाटा मोटर व महिंद्रा आणि महिंद्रा यांच्या समभागांमध्ये वाढ झाली होती. तर भारती इन्फाटेल, आयसीआयसीआय बँक, झी इंटरटेन, ॲक्सिस बँक आणि टायटन कंपनी यांच्या समभागांमध्ये घसरण झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button