breaking-newsताज्या घडामोडीपुणे
परदेशी न जाता पुण्यात एका महिलेला कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/corona7.jpg)
पुणे – पुण्यात आणखी एका महिलेला कोरोनाची लागण आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 53 झाली आहे. तर पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. सध्या या महिलेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एका 41 वर्षीय महिलेला (Pune Corona Patient) कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेला परदेशात न जाता कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिला ताप आणि सर्दीचा त्रास होत होता. त्यानंतर तिचे नमुने तपासले असता ती कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे. त्यामुळे आता ही महिला नेमकी कोणाच्या संपर्कात आली? तिला कोरोनाचा संसर्ग कसा झाला? याची तपासणी सुरु आहे.