Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

तुम्ही मातोश्रीबाहेर कॅमेरे लावले होते का? चंद्रकांतदादांना सवाल

पुणे |महाईन्यूज|

‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना त्यांनी मातोश्रीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते का?, हे चंद्रकांत पाटील यांनी नक्कीच माहिती असेल. आणि त्याच कल्पनेतून त्यांनी हे विधान केले असावे.’ असा टोलाही राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील मंत्रीपदाच्या वाटपावर टीका केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रीपद दिल्यास ‘मातोश्री’ बाहेर कॅमेरे लागतील. अशी बोचरी टीका त्यांनी केली होती. त्यावर जयंत पाटील यांनी कोथरूडमध्ये साहित्यिक कलावंत संमेलनाच्या उदघाटन पूर्वी पत्रकारांशी बोलताना दिली.

‘गेली पंचवीस वर्षे भाजपने उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली, शिवसेनेला दुय्यम दर्जाची वागणूक दिली, लहान भाऊ म्हणून वागवले. त्यामुळेच शिवसेना युतीतून बाहेर पडली. शिवसेनेचा काँग्रेस- राष्ट्रवादी सोबतचा अनुभव चांगला असेल, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button