‘टिक टाॅक’धरतीवर ‘टिक टॅक’ ॲप बाजारात; पुण्यातील युवकाने बनविले ॲप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/3.jpg)
पुणे |महाईन्यूज|
चीनच्या बंदी घातलेल्या टिक टॉकला पर्याय म्हणून पुण्यातील एका युवकाने भारतीय बनावटीचे टिक टॅक हे ॲप बनवले आहे. टिक टॉकच्या धरतीवर ग्रामीण भागातील एका तरुणाने टिक टॅक (Tik Tac) हा नवा पर्याय समोर आणला आहे. त्यामुळे निराश झालेल्या लाखो युजर्सना आता टिक टॅकवर व्हिडिओ तयार करून प्रसिद्धी मिळवता येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील राहुल खोमणे या युवकाने भारतीय बनावटीचे टिक टॉकचे हुबेहूब असे टिक टॅक ॲप बाजारात आणले आहे. इंदापूरमधील कुल्फी विक्रेता ते पुणे, बारामती येथील आय. टी कंपनीचा मालक अशी गरुडझेप घेतलेल्या राहुल खोमणे व त्याचे सहकारी रणजीत घाडगे, अक्षय गोरड, राहुल कदम यांनी चीनच्या बंदी घातलेल्या टिक टॉकला पर्याय म्हणून टिक टॅक हे ॲप बनवले आहे.
आबालवृद्ध नागरिकांचे मनोरंजन व कला सादरीकरण केंद्रबिंदू मानून हे ॲप मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेत तयार करण्यात आले असून एक महिन्यात 7 हजार नागरिक हे ॲप वापरू लागले असून 10 हजार व्हिडीओ अपलोड झाले आहेत. चीनच्या 59 अॅप्सवर बंदी घातल्यानंतर व त्यात टिक टॉकचा समावेश असल्यामुळे राहुल व सहकाऱ्यांनी संधी ओळखून टिक टॉकला पर्याय म्हणून टिक टॅक हे ॲप बनवले. या ॲपमध्ये सर्व टिक टॉक सारखी फीचर्स असून ॲप महाराष्ट्रातील राज्यातील प्रथम ॲप असल्याचा राहुल याचा दावा आहे. भविष्यात या ॲप वरील युजर्सना पैसे कमवून देण्याचा त्यांचा मानस असून पॉप्युलर क्रियेटरसाठी ब्ल्यू टिक सुद्धा या अॅपमध्ये असून हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.